सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी हे प्रेक्षकांचे लाडके कलाकार वारस या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. ही गुरू-शिष्य जोडी वारस या चित्रपटात झळकणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागलेली आहे. सिद्धार्थ चांदेकरही या चित्रपटाचा भाग असणार आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना सिद्धार्थ सांगतो, "सचि न पिळगावकर आणि स्वप्नील जोशी या स्टार कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते हे मला कळल्यावर मी आनंदित झालो होतो. कामाच्या बाबतीत हे दोघेही खूपच प्रोफेशनल आहेत. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात. वारस या चित्रपटातून खूप सुंदर संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे."
दिग्गज कलाकारांसोबत सिद्धार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 12:45 IST