Join us

सिद्धार्थ जाधव वधूच्या शोधात?, काय आहे ही भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 07:15 IST

लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे  नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जाता.

ठळक मुद्देसिद्धार्थ यात मारुती राजाराम पाटीलची भूमिका साकारत आहे

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी चित्रपटासाठी आहे.

लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे  नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यात तो वधू -वर सूचक केंद्राचा बॅच लावून दिसत आहे, यावरून तो वधूच्या शोधात असल्याचे कळतेय. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मारुती राजाराम पाटीलची भूमिका साकारत आहे. मुळात चित्रपटाचे नाव 'लग्नकल्लोळ' असल्याने यात लग्न, धमाल, गोंधळ असा सगळा मसाला बघायला मिळणार आहे. मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा दिलशाद शेख यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले आहे. डीओपीचे काम दिलशाद व्हीए यांनी पाहिले आहे. सध्या या चित्रपटाचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरु असून वर्षाअखेरीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

टॅग्स :सिद्धार्थ जाधव