Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:13 IST

सिद्धार्थ आयपीएलच्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना दिसला. यावेळी त्याने भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाची भेट घेतली.

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून त्याने अभिनयाची छाप पाडली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने कोणताही गॉडफादर नसताना सिनेइंडस्ट्रीत अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं. सिद्धार्थचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सिद्धार्थ क्रिकेटचा चाहता आहे. नुकताच सिद्धार्थ आयपीएलच्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना दिसला. यावेळी त्याने भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाची भेट घेतली. याचा व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत सिद्धार्थ आणि सुरेश रैना हँडशेक करताना दिसत आहेत. त्यानंतर ते गळाभेटही घेतात. 

हा व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थ म्हणतो, "ग्रेटभेट. सुरेश रैना सर तुम्हाला भेटून आनंद झाला. इंडियन क्रिकेट टीममधील उत्तम खेळाडू आणि विनम्र व्यक्ती...माझ्या कामाचं कौतुक केल्याबद्दल आभार. लवकरच पुन्हा भेटू...तुमचा अभिमान आहे". सिद्धार्थच्या या व्हिडिओवर सुरेश रैनाने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. 

सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. चाहत्यांबरोबर सेलिब्रिटींनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसुरेश रैनाआयपीएल २०२४