Join us

विमानाने प्रवास करताना सिद्धार्थच्या सामानाचं नुकसान; अभिनेता भडकला, म्हणाला, "ज्या पद्धतीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:05 IST

विमानाने प्रवास करताना सिद्धार्थच्या सामानाचं नुकसान झालं आहे. याचा व्हिडिओ शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमांमधून विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सिद्धार्थ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. 

सिद्धार्थने नुकताच विमानाने मुंबई ते गोवा असा प्रवास केला. पण, यावेळी प्रवास करताना त्याच्या सामानाचं नुकसान झालं. सिद्धार्थने व्हिडिओ शेअर करत हा अनुभव सांगितला आहे. त्याबरोबरच प्रसिद्ध विमान कंपनीवरही सिद्धार्थने संताप व्यक्त केला आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने सामानाची अवस्था दाखवली आहे. सिद्धार्थची बॅग तुटलेली पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थ म्हणतो, "मी आता इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. म्हणजे जवळजवळ त्यांनी फक्त हँडलच बाकी ठेवला आहे. बाकी केअर तर तुम्हाला दिसतच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. ते पाहून मला खूप छान वाटलं. आता मी आणखी काय बोलू...वाह."

दरम्यान, सिद्धार्थने 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'धुरळा', 'क्षणभर विश्रांती', 'दे धक्का', 'हुप्पा हुय्या' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही सिद्धार्थने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रोहित शेट्टीच्या 'सर्कस', 'सिम्बा', 'सुर्यवंशी' या सिनेमात तो झळकला आहे.  

टॅग्स :सिद्धार्थ जाधवमराठी अभिनेता