Join us

सिद्धार्थ जाधवनं दणक्यात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाला "माझे सुपर हिरो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:03 IST

"तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहीन" सिद्धार्थ जाधवची वडिलांसाठी खास पोस्ट!

सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यानं लाखो चाहते निर्माण केले आहेत. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. पण, या संंघर्षात आई आणि वडिलांनी त्याला मोठा पाठिंबा दिला. सिद्धूचं त्याच्या आई आणि बाबांवर प्रचंड प्रेम आणि आदर आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्यानं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ जाधवनं हटके पोस्ट शेअर करत केली आहे. 

सिद्धार्थ जाधवनं आपल्या वडिलांचा दणक्यात वाढदिवस साजरा केलाय. वाढदिवसाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा... माझे सुपर हिरो! रामचंद्र भागोजी जाधव... तुमच्यावर सदैव आणि अखेरपर्यंत प्रेम करत राहीन...", या शब्दात त्यानं वडिलांवरील प्रेम व्यक्त केलं. सिद्धार्थ जाधवच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत  शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सिद्धार्थ जाधवच्या कुटुंबाविषयी...

सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ साली झाला. कोंकणातील रत्नागिरी हे त्याचे जन्मगाव आहे, तर वास्तव्य मुंबईतच आहे. मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला. सिद्धार्थने १० मे २००७ मध्ये तृप्ती अक्कलवारशी लग्न केलं होतं. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. 

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'आता थांबायचं नाय' या चित्रपटात झळकला. हा चित्रपट १ मे २०२५ या दिवशी प्रदर्शित झालाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१६ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबत भरत जाधव ओम भूतकर आणि प्राजक्ता हनमघर यांसारख्या कलाकारांची मांदियाळी आहे. तर लवकरच तो नागराज मुंजळे यांच्या 'मटका किंग' या हिंदी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवमराठी अभिनेतासोशल मीडिया