Join us

‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:29 IST

'झिम्मा २'मधून पुन्हा एकदा बायकांच्या ट्रीपची आणि त्यांच्या मजेदार रियुनियनची गोष्ट पाहायला मिळत आहे.

सध्या सर्वत्र 'झिम्मा २' या मराठी सिनेमाचीच हवा असल्याचं पाहायला मिळत आहे.  २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्मा सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'झिम्मा २'मधून पुन्हा एकदा बायकांच्या ट्रीपची आणि त्यांच्या मजेदार रियुनियनची गोष्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहेत.  'झिम्मा २' मध्ये कबीर हे पात्र साकारणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

सिद्धार्थने चित्रपटातील अभिनेत्रींचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट केली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहले की, 'काय कमाल आहे ना बायकांची? एवढं हसायला आणि हसवायला शिकतात कुठून? मनापासून प्रेम करायला, मनापासून काळजी घ्यायला, मनापासून जगायला ते ‘मन’ किती शक्तिशाली असेल ह्याची कल्पना करणं सुद्धा अवघडच'.

पुढे तो म्हणाला, 'संकटाच्या, दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसून बघायला काय ताकद लागत असेल. आणि एवढं असून सुद्धा लहान बाळासारखं हट्ट करायला पण मागे पुढे बघत नाहीत. अजब आहात तुम्ही. खरंच… काय कमाल आहे ना बायकांची? ह्यांचं सौंदर्य एका फोटोत कधीच दाखवता यायचं नाही… हास्य दाखवण्याचा हा माझा बारीक प्रयत्न'.

 हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपटात रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुहास जोशी, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'झिम्मा २' पाहण्यासाठी खासकरुन महिला वर्ग थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतारिंकू राजगुरू