Join us

धसमुसळी बायको! सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला मिताली मयेकरचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 17:14 IST

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरच्या एका व्हिडीओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक आवडते कपल आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत. दोघांची फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे.  मितालीच्या वाढदिवसानिमित्त दोघेही दुबईत फिरायला गेले होते. तेव्हा तेथील त्यांचे रोमँटिक फोटो चर्चेत आले होते. मात्र, सध्या त्यांच्या एका व्हिडीओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.  

 सिद्धार्थने सोशल मीडियावर बायको मितालीचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मिताली वाळवंटात चालताना दिसत आहे.  चालता-चालता तीचा तोल जातो आणि धपकन पडते.  यानंतर ते दोघंही जोरात हसू लागतात.  'Perks of getting to shoot for the धसमुसळी बायको! Very glamorous', असं मजेशीर कॅप्शन सिद्धार्थन या व्हिडीओला दिलं आहे. सध्या त्यांचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सिद्धार्थ आणि मितालीने पुण्याच्या ढेपेवाड्यात २०२१ मध्ये लग्न केले. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल तर, सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरमराठी अभिनेता