Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझी लक्ष्मी", सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहुर्तावर घरी आणली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 12:04 IST

सिद्धार्थ-मितालीने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा फोटो शेअर करत सिद्धार्थ-मिताली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.नवीन प्रोजेक्टबाबत पोस्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातीलही महत्त्वाच्या गोष्टींची ते सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देतात. सिद्धार्थ-मितालीने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती त्यांनी चाहत्यांना दिली आहे. 

दिवाळीच्या मुहुर्तावर सिद्धार्थ-मितालीने KIA कंपनीची गाडी घरी आणली आहे. याचे फोटो सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. "एकत्र प्रगती करतोय...आम्ही एकत्र घेतलेली पहिली गाडी...बायको मला तुझा अभिमान आहे," असं सिद्धार्थने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मितालीने गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "माझी लक्ष्मी आली" असं कॅप्शन दिलं आहे. सिद्धार्थ आणि मितालीने घेतलेल्या या गाडीची किंमत सुमारे १० ते २० लाखांच्या घरात आहे. 

सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. 'झेंडा' या अवधूत गुप्तेच्या चित्रपटांतून त्याला पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर सिद्धार्थने 'गुलाबजाम', 'क्लासमेट्स', 'वृंदावन', 'झिम्मा', 'रणांगण', 'वजनदार', 'ऑनलाईन बिनलाईन' अशा अनेक चित्रपटांत काम केलं. 'अग्निहोत्र' या गाजलेल्या मालिकेतही सिद्धार्थ महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. 

दरम्यान, मितालीदेखील एक उत्तम अभिनेत्री आहे. 'फ्रेशर्स' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मिताली अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली. 'लाडाची मी लेक गं' या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली. सिद्धार्थ आणि मितालीने २०२१मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरसेलिब्रिटींची दिवाळीदिवाळी 2023