Join us

सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरला वाढदिवसादिवशी दिले हे मोठ्ठे सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 14:43 IST

मितालीचा ११ सप्टेंबरला वाढदिवस होता आणि या खास दिवशी सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोझ केले आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थने केले मितालीला प्रपोझ

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र आता याबाबतची कबूली खुद्द या दोघांनी सोशल मीडियावर केला आहे. मितालीचा ११ सप्टेंबरला वाढदिवस होता आणि या खास दिवशी सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोझ केले आहे. मितालीने बर्थ डे सेलिब्रेशनसोबत सिद्धार्थसोबत त्याने दिलेल्या रिंगचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर यांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघे अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती. मात्र मितालीने इंस्टाग्रामवर टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले आहे. मितालीने सिद्धार्थ आणि मित्रमंडळींसोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, हे सांगायचे विसरले होते. सिद्धार्थने मला प्रपोझ केले आणि मी त्याला होकार दिला आहे. अॉफिशिएल मी त्याने दिलेली रिंग स्वीकारली आहे. मितालीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

तर सिद्धार्थने मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंस्टाग्रामवर लिहिले की, हॅप्पी बर्थडे. बॅटमॅनपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करतो. देवाचा आभारी आहे की आपण भेटलो. नेहमीप्रमाणे हसत रहा.

मिताली व सिद्धार्थने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा सोशल मीडियावर करून अखेर त्यांच्या नात्यबाबतच्या चर्चेला पू्र्णविराम दिला आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर