Join us

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे झळकणार 'अधांतरी'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 22:09 IST

अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे हे सुपरस्टार हंगामा प्लेच्या अधांतरी या आगामी ओरिजनल मराठी शोमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. लाँग-डिस्टंस नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील आहेत.

क्लासमेट, लॉस्ट अँड फाऊंड, ऑनलाइन बिनलाइन, गुलाबजाम, रणांगण अशा मराठी सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याच्या सांग तू आहेस का? जीवलगा, प्रेम हे, सिटी ऑफ ड्रिम्स आणि इतर मालिकांमधील भूमिकाही गाजल्या. अंधातरीमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी तो म्हणाला, "मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत."

फास्टर फेणे, फोटोकॉपी, बघतोस काय मुजरा कर, वायझेड, रमा माधव हे सिनेमे आणि अनेक  नाटकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली पर्ण पेठे म्हणाली, "परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवाला लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल."

गणराज असोसिएट्स निर्मित आणि जीत अशोक दिग्दर्शित हा शो लवकरच हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्क्स उपलब्ध असेल.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरपर्ण पेठे