Join us

श्रुती मराठे करणार आयटम साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 16:49 IST

राधा ही बावरी या मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. यानंतर श्रुती प्रेक्षकांना अनेक मराठी चित्रपटातून ...

राधा ही बावरी या मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. यानंतर श्रुती प्रेक्षकांना अनेक मराठी चित्रपटातून पाहायला मिळाली आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री एक आयटम साँग करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती पेज फोर या चित्रपटात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. तिच्या या आयटम सॉन्गविषयी श्रुती लोकमत सीएनएक्सला सांगते, हे माझे दुसरे आयटम सॉग्न आहे. यापूर्वी मी बाजी या चित्रपटातदेखील आयटम साँग केले आहे. प्रेक्षकांना चित्रपटात कोणती गाणी असणार याबाबत नेहमीच उत्सुकता असते. तसेच या चित्रपटात या आयटम साँगशिवाय इतर कोणतीच गाणी नाहीत. त्यामुळे रसिली फ्रुटी हे आयटम साँग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच हे गाणे खूपच छान आहे. अरेबियन टच असे हे गाणे आहे. खरं तर हा मराठी चित्रपट असला, तरी हे गाणे मात्र  हिंदी आहे. या चित्रपटातील हे गाणेदेखील एक महत्वाचा भाग आहे. जयदीप येवले, परितोष प्रधान,क्षितीज कुलकर्णी दिग्दर्शित पेज फोर हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना निखिल राऊत, सौरभ गोखले, ओकांर गोवर्धन, गिरीश परदेशी हे कलाकार मुख्य भुमिकेत झळकणार आहेत. तर याव्यतिरिक्त मधुरा वेलणकर, विभावरी देशपांडे, गौतमी देशपांडे, केतकी नारायण, दिप्ती यांचा देखील या चित्रपटात समावेश असणार आहे. चार मित्रांची ही कहानी आहे. समाजात घडणाºया घटनांवर हा चित्रपट आहे. समाजात घडणारे कृत्य व त्याचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम हा पेज फोर या चित्रपटाच्या माध्यमातून  प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. श्रुती ही नुकतीच अभिनेता गौरव घाटणेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे. त्याचबरोबर लग्नानंतर पहिल्यांदाच ती प्रेक्षकांना आयटम साँग करताना दिसणार आहे.