Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशी सुरू झाली होती अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकरची लव्हस्टोरी, या सिनेमाच्या सेटवर झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 16:35 IST

4 डिसेंबर 2016ला श्रुती आणि गौरव लग्नाच्या बंधनात अडकले.

अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करतायेत. श्रुतीने इन्स्टाग्रामवर गौरवसोबतचा फोटो शेअर करत त्याला  वेडिंग अ‍ॅनिव्हसरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रेटींनसह चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 4 डिसेंबर 2016ला श्रुती आणि गौरव लग्नाच्या बंधनात अडकले. 

श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

श्रुती मराठेने 2009 मध्ये आलेल्या 'सनई चौघडे' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले. तर इंदिरा विजहा या सिनेमातून तिने साऊथमध्ये एंट्री घेतली.श्रुतीने असा मी तसा मी, लागली पैज सत्या, सावित्री आणि सत्यवान, रामा माधव आणि तुझी माझी लव्हस्टोरी अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेमांसोबत श्रुती छोट्या पडद्यावर ही झळकली आहे

टॅग्स :श्रुती मराठे