कास्टिंग काउचमध्ये श्रिया पिळगावकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 11:36 IST
सध्या अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी या दोन कलाकारांच्या वेब मालिकेची चर्चा रंगू लागली आहे. कास्ंिटग काउच या एपिसोडच्या पहिल्या भागात राधिका आपटे झळकली होती. तर या मालिकेचा दुसरा एपिसोडमध्ये श्रिया पिळगावकर पाहायला मिळाली.
कास्टिंग काउचमध्ये श्रिया पिळगावकर
सध्या अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी या दोन कलाकारांच्या वेब मालिकेची चर्चा रंगू लागली आहे. कास्ंिटग काउच या एपिसोडच्या पहिल्या भागात राधिका आपटे झळकली होती. तर या मालिकेचा दुसरा एपिसोडमध्ये श्रिया पिळगावकर पाहायला मिळाली. त्यामुळे साहजिकच या वेब मालिकमध्ये पुढच्या भागात कोण झळकणार याची उत्सुकता जी होती ती आता संपली आहे. कारण पहिल्या एपिसोडनंतर चक्क ३० दिवसानंतर दुसरा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या श्रिया ही शाहरूखच्या फॅन या चित्रपटामुळे खूप चर्चेत आली आहे. त्यामुळे तिला जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कास्टिक काउच ही एक संधी आहे. या मालिकेत सुप्रिया पिळगावकर या श्रियाची मोठी बहिण असल्याचं सांगून निपून या सुरूवात करतो असे यात दाखविण्यात आले आहे. आणि त्यानंतर काय गमती घडल्या असतील हे तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरचं कळेल. श्रियाने शाहरूख खानच्या फॅन या चित्रपटात आर्यन खन्नाचा चाहता असलेल्या गौरवच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.