वैभवचा नव्या प्रोजेक्टसाठी ‘श्री गणेशा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 20:31 IST
आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा वैभव लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी नवा प्रोजेक्ट घेऊन येतोय. आणि याबाबतची अधिक माहिती लवकरच उलगडेल, असे ...
वैभवचा नव्या प्रोजेक्टसाठी ‘श्री गणेशा’
आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा वैभव लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी नवा प्रोजेक्ट घेऊन येतोय. आणि याबाबतची अधिक माहिती लवकरच उलगडेल, असे तो म्हणतोय. याबाबत त्याने फेसबुकवरही पोस्ट केलयं, ते म्हणजे ‘बाप्पाचे आशिर्वाद घेऊन नवीन प्रकल्पाची सुरूवात, अधिक माहिती लवकरच! त्याच्या नव्या प्रोजेक्टचा श्रीगणेशा तर झालाय, पण याबाबत सर्वानाच उत्सुकता लागुन राहिलीय. उंच, देखणा आणि सध्याचा स्मार्ट हिरो म्हणजे वैभव तत्त्ववादी. मालिका, नाटक आणि सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा वैभवने ‘ कॉफी आणि बरंच काही’ या सुपरहिट सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनय फक्त मराठी पुरताच मर्यादित न राहता ‘हंटर’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमात सुद्धा तो चिमाजी अप्पांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. मि.अॅण्ड मिसेस सदाचारी’ सिनेमातून वैभवचा डॅशिंग लूक समोर आला तर आगामी ‘चीटर’ मधून हटके भूमिकेत झळकतोय.