Join us  

​श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेला झाला स्वाईन फ्लू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 5:40 AM

स्वाईन फ्लूची साथ सध्या सगळीकडेच पसरली आहे. यामुळे अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. आता बॉलिवूडचे कलाकार देखील या ...

स्वाईन फ्लूची साथ सध्या सगळीकडेच पसरली आहे. यामुळे अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. आता बॉलिवूडचे कलाकार देखील या स्वाईन फ्लूने त्रस्त झाले आहेत. श्रेयस तळपदेने मराठी मालिकांमधून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचे अनेक मराठी चित्रपट गाजले. मराठी चित्रपटात मिळालेल्या यशानंतर तो हिंदीकडे वळला. गोलमाल, इक्बाल यांसारख्या चित्रपटात त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयक्षेत्रा नंतर त्याने निर्मितीक्षेत्रात आपले भाग्य आजमावले. त्याचे प्रोडक्शन हाऊस सध्या जोरात सुरू आहे. त्याची पत्नी त्याच्यासोबत त्यांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. श्रेयस सध्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण करत आहे. गोलमाल ४ मध्ये तो मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणात जात आहे तर दुसरीकडे पोस्टर बॉईज या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत आहे. तो दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला तितकाच वेळ द्यायचा तो सध्या प्रयत्न करत आहे. तो कामात कितीही बिझी असला तरी तो नेहमीच त्याच्या कुटुंबीयांना वेळ देतो. पण श्रेयसची पत्नी दीप्तीला स्वाईन फ्लू झाला असल्यामुळे सध्या त्याची चांगलीच तारांबळ उडली आहे. स्वाईन फ्लूमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीप्ती रुग्णालयात असली तरी गोलमाल ४च्या चित्रीकरणासाठी खूप आधीच तारखा दिल्या असल्याने श्रेयस चित्रीकरण देखील करत आहे. तसेच पोस्टर बॉईच्या कामातही लक्ष देत आहे. याविषयी श्रेयस सांगतो, माझ्यासाठी ही खूप कठीण वेळ आहे. मी नुकताच गोलमालच्या चित्रीकरणावरून घरी परतल्यानंतर दीप्तीला खूप ताप असल्याचे माझ्या लक्षात आले. तिचा ताप उतरतच नसल्याने तिला दुसऱ्या दिवशी आम्ही रुग्णालयात दाखल केले. पण सध्या मी पोस्टर बॉईज आणि गोलमाल ४ या दोन्ही चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. पण तरीही या सगळ्यातून वेळ काढून मी रुग्णालयात जाऊन दीप्तीची काळजी घेत आहे. Also Read : तब्बूने ‘गोलमाल अगेन’च्या सेटवरील तुषार कपूर, जॉनी लिव्हरसोबतचा सेल्फी केला शेअर!