Join us

श्रेया पुन्हा मराठीत गाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:55 IST

          गायिका श्रेया घोषालने तिच्या मधुर आवाजाने नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता पुन्हा एकदा ...

 
         गायिका श्रेया घोषालने तिच्या मधुर आवाजाने नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादु दाखवायला श्रेया सज्ज झाली आहे. अस्सल मराठमोळ््या तडक्यातील एक भन्नाट गाणे श्रेया लवकरच एका मराठी चित्रपटात गाणार असल्याचे समजतेय. आता हे गाणे कोणत्या चित्रपटात आहे किंवा कोणत्या अभिनेत्रीसाठी ती आवाज देणार या गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. श्रेयाने आजपर्यंत अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपटांसाठी देखील श्रेयाने बरीच गाणी गायली आहेत. श्रेयाची अनेक मराठी गाणी सुपरहिट देखील झाली आहेत. आता श्रेयाचा आवाज पुन्हा एकदा मराठीत घुमणार यामुळे तिचे चाहते नक्कीच खुष असतील.