नुकतीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल ‘बायकोला हवं तरी काय' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन बहुआयामी अशा प्रियदर्शन जाधवने केले आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे 'लूक्स' या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'बायकोला हवं तरी काय' या वेबसीरिजची अजून एक खासियत म्हणजे कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि हँडसम अनिकेत विश्वासराव ही नवीन आणि फ्रेश जोडी.
या वेब सीरीजबद्दल सांगताना श्रेया म्हणाली, " मी यात एका सामान्य गृहिणीची भूमिका निभावत आहे. तिला तिच्या नवऱ्याने अपग्रेड व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ती देवाजवळ नेहमी मागणे मागते. तेव्हा तिला देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर जी मजा यायला सुरुवात होते यावर ही सीरिज आहे."
ही सीरिज करताना खूप मजा आली. शिकायला मिळाले. सीरिज पाहताना सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आपल्यासोबत सुद्धा असे घडले तर? असे वाटेल. सर्वांची मने जोडणारी अशी ही सिरीज आहे."