श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर यांचा तरुणाईला संगीताची नवी 'फिलिंग' देणारा मुजिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 13:02 IST
लवकरच एक एक नवाकोरा अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हा अल्ब थोडा खास असणार आहे. किरण विलास ...
श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर यांचा तरुणाईला संगीताची नवी 'फिलिंग' देणारा मुजिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला
लवकरच एक एक नवाकोरा अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हा अल्ब थोडा खास असणार आहे. किरण विलास खोत यांनी या अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले असून अल्बममध्ये तब्बल १२ दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंताची आवाजातली गाणी गायला मिळणार आहे. या अल्बममध्ये प्रणय,विरह,श्रुंगार,प्रेम,प्रोत्साहन आणि पाऊस या थीम्सवर आधारित गाणी असणार आहेत. विशेष म्हणजे, श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे अशा नामांकित गायकांचा आवाज या म्युजिक अल्बमला लाभला असून मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर,सचिन खेडेकर,जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर प्रिया बापट, स्पृहा जोशी, आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या आवाजाची जादूदेखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या म्युजिक अल्बमचे सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. १२ दर्जेदार कलावंतांची म्युजीकल 'फिलिंग' देणाऱ्या या गाण्यांवर चित्रित केलेले ऑडियो लवकरच रसिकांना अनुभवता येणार आहे.तरुणाईला संगीताची नवी 'फिलिंग' देणारा हा मुजिक अल्बम रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. मानवी स्वभावगुण अचुक टिपणारी या अल्बमधील गाणी गाणी प्रत्येक वयोगटातील श्रोत्यांना भुरळ पाडणारी आहेत. याविषयी किरण विलास म्हणतात "गीतकार आणि संगीत दिग्दर्शक या नात्याने 'फिलिंग' या अल्बम माझ्यासाठी ही एक फक्त सुरुवात असून, यानंतर अशा विविध प्रोजेक्ट आणि संगीतामार्फत माझी मजल दरमजल निरंतर चालू राहील.फक्त आम्हाला रसिकांचे प्रेम आणि आशिर्वाद मिळावेत अशी आशा व्यक्त केली आहे.