Join us

जाऊ दया ना बाळासाहेब या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 19:28 IST

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित जाऊ दया ना बाळासाहेब या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी या चित्रपटाचे आजय-अतूल लाव डॉल्बीवाल्या...हे भन्नाट गाणं प्रदर्शित करण्यात आले होते

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित जाऊ दया ना बाळासाहेब या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी या चित्रपटाचे अजय-अतूल लाव डॉल्बीवाल्या...हे भन्नाट गाणं प्रदर्शित करण्यात आले होते. या टिझरची सुरुवात गिरीश कुलकर्णी उर्फ बाळासाहेब यांच्या मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा नव्या चैतन्याचा... या शब्दांनी होते. तसेच या चित्रपटात  गिरीश कुलकर्णी, मोहन जोशी, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी या कलाकारांचा समावेश आहे.