Join us

आकाशच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग पोलीस बंदोबस्तात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 12:33 IST

‘सैराट’च्या तूफान यशानंतर रातोरात स्टार झालेल्या आकाश आणि रिंकू यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांना याड लागलं आहे. मात्र याचाच ...

‘सैराट’च्या तूफान यशानंतर रातोरात स्टार झालेल्या आकाश आणि रिंकू यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांना याड लागलं आहे. मात्र याचाच परिणाम त्यांच्या खाजगी आयुष्यावर होत असून आकाशच्या आगामी दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगवरही परिणाम जाणवत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'FU' या आगामी चित्रपटात आकाश ठोसर काम करत आहे. सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.'FU' च्या सेटवर आकाश आहे, याची कुणकुण लागू नये, याचा सर्वतोपरी प्रयत्न सिनेमाची टीम करत आहे. मात्र आकाश जिथे जातो, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटते. त्यामुळे आकाशसोबत शूटिंग करणं अतिशय अडचणीचं बनल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. ‘FU'हा तरुणाईचा चित्रपट असल्याचं महेश मांजरेकर सांगतात. ‘सिनेमाच्या नावातच सर्वकाही आहे. याच्या इनिशियल्समधून त्याचा अर्थ उघड होतो. मात्र सेन्सॉर बोडार्साठी या सिनेमाचं नाव ‘फन अनलिमिटेड’ आहे.