Join us
Daily Top 2Weekly Top 5

शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:39 IST

आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.

आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर  प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो. या सिनेमामध्ये संजय जाधव यांच्यासह प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड,वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे, तर अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत. ‘लग्न मुबारक’ ची गाणी अक्षय कर्डक यांनी लिहिली असून साई – पियुष,  ट्रॉय अरिफ यांनी स्वरबद्ध केली आहेत. आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने आधीच डोक्यावर घेतले आहे. ‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ,सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ मधून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव अभिनयात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच एक संजय जाधव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूकदेखील खूप वेगळा आहे. लग्न मुबारक या चित्रपटात प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\