Join us

शितल उपरे तामिळमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 18:51 IST

 मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री यापूर्वी तामिळ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळल्या आहेत. आता, यांच्यापाठोपाठ अभिनेत्री शितल उपरे ही देखील लवकरच ...

 मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री यापूर्वी तामिळ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळल्या आहेत. आता, यांच्यापाठोपाठ अभिनेत्री शितल उपरे ही देखील लवकरच एका तामिळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव वीर मुन्डांन पट्टी असल्याचे शितलने लोकमत सीएनएक्सला सांगितले. शितल सांगते, या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत असणार आहे. माझ्या भूमिकेचे नावच या चित्रपटात वीर आहे. माझ्याभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा आहे. ब्रिटीशकालीन हा चित्रपट असणार आहे. थोडक्यात हा चित्रपट पाहताच प्रेक्षकांना लगान या चित्रपटाची आठवण होईल. पण वास्तव अशी चित्रपटाची कहानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. पण एक कलाकार म्हणून अशा वेगवेगळया व हटक्या भूमिका करण्यास मला फार आवडतात. या चित्रपटाचे चित्रिकरण छोटया खेडयात झाले आहे. चक्क पंधरा दिवस राहून तेथील स्थानिक लोकांचे राहणीमान पाहिले. त्यानुसार ते राहणीमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप मोठे चॅलेंज होते. तसेच अभिनेत्री स्मिता पाटील, मीरा नायर या अभिनेत्री माझ्यासाठी नेहमीच प्रेरणा देणाºया असल्यामुळे मी हे चॅलेंज पूर्ण करण्याचा आत्मविश्वास मिळाला. शितलने यापूर्वी मिस हेरीटेजचा उपविजेतेपदाचा किताब पटकवला. तसेच इंडियन प्रेमाचा लफडे या चित्रपटादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.