Join us

शेखर फडकेचे कमबॅक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:15 IST

'फू बाई फू'मधील एक विनोदवीर म्हणजे शेखर फडके. तिथे त्याने त्याच्या विनोदी शैलीचा वेगळा ठसा उमटवला खरा. पण मधले ...

'फू बाई फू'मधील एक विनोदवीर म्हणजे शेखर फडके. तिथे त्याने त्याच्या विनोदी शैलीचा वेगळा ठसा उमटवला खरा. पण मधले काही दिवस तो छोट्या पडद्यावरून गायबच झालेला असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. मात्र आता शेखर पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'सरस्वती' या आगामी मालिकेतून. यामध्ये तो वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे समजते. छोट्या पडद्यावर बर्‍याच दिवसांनी शेखरचे कमबॅक असल्याने तो पुन्हा एकदा त्याच जोशात पाहायला मिळणार, याबद्दल शंकाच नाही.