श्रिया जर्मन बॉलीवुडच्या कव्हरपेजवर झळकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:25 IST
सध्या फॅन या चित्रपटामुळे श्रिया पिळगावकर हिच्या करिअरला चार चाँद लागले आहेत. तसेच या चित्रपटामुळे श्रिया नेहमीच चर्चेत आहे. ...
श्रिया जर्मन बॉलीवुडच्या कव्हरपेजवर झळकली
सध्या फॅन या चित्रपटामुळे श्रिया पिळगावकर हिच्या करिअरला चार चाँद लागले आहेत. तसेच या चित्रपटामुळे श्रिया नेहमीच चर्चेत आहे. तसेच बॉलीवुडचा बादशहा शाहरूख खान याच्यासोब फॅन या चित्रपटात काम केल्यामुळे तिचे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक मुलगी श्रिया पिळगांवकर आता थेट इश्क या जर्मन बॉलिवूड मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. या मॅगझिनसाठी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने तिचे फोटोशूट केले होते. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत श्रियाने नाव कमावलं याचा सर्वांनाच अभिमान आहे.