Join us

"एका वेगळ्या रुपात तिचं आज दर्शन झालं…", पूजा सावंतने नवरात्रौत्सवानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:09 IST

Pooja Sawant : पूजा सावंतने इंस्टाग्रामवर नवरात्रीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे.

पूजा सावंत (Pooja Sawant) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०१० साली 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'लपाछपी' आणि 'नीलकंठ मास्तर' यांचा समावेश आहे. पूजा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर नवरात्रीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे.

पूजा सावंत हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आणि लिहिले की, घटस्थापनेला मी घरी नसण्याची ही पहीलीच वेळ.. कामानिमीत्त मुंबईबाहेर शूट करतेय.. आज पहिल्यांदा देवाची स्थापना माझ्या डोळ्यादेखत नाही झाली.. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.. पण शेवटी ती आईच .. तिचं लक्ष  तिच्या बाळांवर नेहमी असतं.. एका वेगळ्या रुपात तिचं आज दर्शन झालं… जय जगदंब. सर्वांना नवरात्रौत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा.

वर्कफ्रंटमराठी सिनेइंडस्ट्रीतील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे. शेवटची ती 'आंबट शौकीन' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. 

टॅग्स :पूजा सावंत