Join us

शशांक केतकर झळकणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:08 IST

अभिनेता शशांक केतकर 'आरॉन' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ठळक मुद्दे'आरॉन' हा इंडो फ्रेंच असा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा'आरॉन'चे पोस्टर प्रदर्शित

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून 'श्री'च्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता शशांक केतकरने नाटक, मालिका व चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता तो एका नव्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'आरॉन' असे त्याच्या सिनेमाचे नाव असून या चित्रपटाचे पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.   शशांक केतकरने 'आरॉन' सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की,' 'आरॉन'-एक अविस्मरणीय प्रवास! माझ्या हद्याच्या जवळचा सिनेमा.' हा इंडो फ्रेंच असा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा असून शशांक एका लहान मुलासमवेत एका थंड आणि धुक्याच्या ठिकाणी आहे. दोघेही कुठेतरी जायला निघाल्याचे पाहायला मिळत आहे.

शशांकने 'आरॉन'चे फर्स्ट लूक जरी उलगडले असले तरी अद्याप या सिनेमाच्या कथेबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यातच आहे. शशांकसोबतच या सिनेमात नेहा जोशी, अथर्व पाध्ये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. ओमकार शेट्टी यांनी या सिनेमाच्या लेखन –दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.गिरीश पवार, कौस्तुभ लाटके आणि अविनाश अहेर यांनी जीएनपी फिल्म्स प्रस्तुत ‘आरॉन’ सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची अधिकृत निवड हैद्राबाद आणि पाँडीचेरीत झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी झाली होती.शशांकच्या नव्या सिनेमा व त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत. 

टॅग्स :शशांक केतकर