Join us

शशांक केतकरला मिळाले खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:26 IST

प्रत्येकासाठी गिफ्ट ही खूप महत्वाची गोष्ट असते. वाढदिवस, लग्न, दिवाळी, नवीन वर्ष अशी विविध आनंदाच्या क्षणी प्रत्येकजण खास गिफ्टची ...

प्रत्येकासाठी गिफ्ट ही खूप महत्वाची गोष्ट असते. वाढदिवस, लग्न, दिवाळी, नवीन वर्ष अशी विविध आनंदाच्या क्षणी प्रत्येकजण खास गिफ्टची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे आता नवीन वर्षाचे आगमन काही दिवसांमध्येच होणार असल्याने गिफ्ट खरेदीसाठी सगळयांची लगबग चालू असल्याची पाहायला मिळत आहे. तर कोणी आपले गिफ्ट आपल्या आवडत्या माणसांलादेखील दिले आहे. असेच एक सुंदर गिफ्ट प्रेक्षकांचा लाडका कलाकार शशांक केतकर याला मिळाले आहे. या कलाकाराला प्रांजली सोलंके या चाहतीने खास गिफ्ट दिले आहे. तिने शशांकला सुंदर स्केच केलेला त्याचा फोटो त्याला दिला आहे. त्याने आपल्या हे आकर्षक स्केच सोशलमीडियावर अपलोड केले आहे. तसेच आपल्या या चाहतीचे आभारदेखील त्याने मानले आहे. कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळणारे हे गिफ्ट त्यांच्या अभिनयाचे कौतुक केल्यासारखेच असते. शशांकसाठी असे हे खास गिफ्ट नवीन वर्षाची भेटच म्हणावी लागेल. शशांक हा होणार सून मी हया घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. तसेच या मालिकेनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि शशांक केतकरची जोडी हीट झाली असल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे सध्या तो इथेच टाका तंबू या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत मधुरा देशपांडे झळकत आहे. तसेच त्याचा नुकताच वन वे तिकीट हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता खानविलकर, नेहा महाजन आणि गश्मिर महाजनी पाहायला मिळाले होते.