Join us

श्रियाचा ग्लॅमरस वॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 17:01 IST

             श्रिया पिळगावकरने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर  बॉलिवूडमध्ये ...

  
           श्रिया पिळगावकरने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर  बॉलिवूडमध्ये एंट्री घेत थेट किंग खान शाहरुख सोबत फॅन या चित्रपटात ती झळकली. आता श्रिया बॉलिवूडमध्येच आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करतेय. मात्र  या चेंदेरी दुनियेत आपला ठसा उमटवणं ही काही सोपी गोष्ट नाही. निर्माता-दिग्दर्शकांच्या नजरेत येण्यासाठी तुम्हाला सतत लाईमलाईटमध्ये रहावे लागते.  जाहिराती, फॅशन शोज, रॅम्प  वॉक करून प्रकाश झोतात यावे लागते. आता हेच पाहा ना, नूकतेच श्रिया रॅम्पवर उतरण्यासाठी सजली होती. आणि श्रियाचा हा पहिलाच फॅशन शो होता. त्यामुळे श्रिया फारच उत्सुक होती. गडद निळ्या रंगाचा लाँग फ्रीलचा गाऊन आणि गोल्डन रंगाचा टॉप घातलेली श्रिया ग्लॅमरस दिसत होती. श्रियाच्या चेह-यावरील आत्मविश्वास पाहता तिचा हा पहिलाच रॅम्प वॉक असेल असे कोणीच म्हणणार नाही.