दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या दिग्दर्शनात साकार झालेल्या या चित्रपटामध्ये खलनायक-अभिनेते ज्यांनी नटरंग सारख्या गाजलेल्या चित्रपटासह अनेक चित्रपटांमधून अभिनय केलेला आहे असे मिलिंद शिंदे तसेच अभिनेते सुनील प्रल्हाद, आणि सिंघम रिटर्न्स या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या फॅंड्री - सैराट फेम छाया कदम, नितिन कांबळे, जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांच्यासोबतच अभिनेत्री नम्रता जाधव, सुदेष्णा नावकार, रेणू महामुनी, ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे हे आहेत. या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण विदर्भातील अनेक भागात झालेले आहे. अभिनेते मिलिंद शिंदे यांनी पहिल्यांदाच या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केलेले असून त्या गीताचे लेखन कवी लेखक किशोर बळी केले आहे. संगीत त्रुप्ती चव्हाण यांनी दिले आहे. चित्रपटातील इतर तीन गाण्यांचे लेखन लहू ठाकरे यांनी केलेले असून संगीत दिग्दर्शनाची धुरा भास्कर दाबेराव यांनी सांभाळली आहे. चित्रपटात गायक आनंद शिंदे, उर्मिला धनगर, स्वप्नील बांदोडकर यांनी आपला आवाज दिला आहे, याव्यतिरिक्त अजून एक सुरेख गाणे अतुल-राहुल नावाच्या नव्या उमद्या जोडगोळीने संगीतबद्ध केले आहे.
काळजाचा ठाव घेणारा चित्रपट 'शिरपा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:17 IST