Join us

सध्या कशात बिझी आहेत शरद पोंक्षे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:41 IST

         अभिनेते शरद पोंक्षे यांच्या अभिनयाचे चाहते अनेकजण आहेत. त्यांचा अभिनय नेहमीच दर्जेदार असल्याचे आपण पाहिले ...

         अभिनेते शरद पोंक्षे यांच्या अभिनयाचे चाहते अनेकजण आहेत. त्यांचा अभिनय नेहमीच दर्जेदार असल्याचे आपण पाहिले आहे. मालिका, चित्रपट आणि रंगभूमी सगळीकडेच त्यांनी स्वत:च्या अभिनयाची मोहोर उमटविली आहे. सध्या रंगभूमीवर आपण शरद पोंक्षे यांना पाहत आहोत. हे राम नथुराम या नाटकातून ते पहिल्यांदाच आपल्याला निर्मात्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर शरद पोंक्षे यांनीच हे नाटक लिहिले देखील आहे. सध्या या नाटकाची जोरदार चर्चा रंगभूमीवर होताना दिसतेय. नाट्यरसिक देखील हे राम नथुराम नाटकाला चांगलीच पसंती दर्शविताना दिसत आहेत. परंतु हे नाटक मराठीमध्ये असल्याने ते भाषेच्या चौकटीत अडकले आहे. हा विषय संपूर्ण भारतात नेण्याचा विचार शदर पोंक्षे यांचा आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या राष्ट्रभाषेत म्हणजेच हे नाटक हिंदीमध्ये लिहिण्यास सुरुवात केली आहे. या नाटकाविषयी शरद पोंक्षे लोकमत सीएनएनएक्सला सांगतात, ''हे राम नथुरामच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतोय. लेखक म्हणून देखील मी प्रथमच काम करतोय. आता माझा विचार आहे हे नाटक हिंदीमध्ये लिहावे असा आहे. त्यामुळे मी हिंदीमध्ये हे नाटक लिहायलादेखील सुरुवात केली आहे. तीन-चार सीन्स लिहुन सुद्धा झाले आहेत. जेव्हा प्रादेशिक भाषेच आपण नाटक करतो तेव्हा त्यावर काही बंधने येतात. प्रेक्षक विभागला जातो. परंतु हिंदीमध्ये नाटक आले की ते फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरात नेता येते असे सुद्धा ते म्हणालेत. आता हे राम नथुरामच्या हिंदी नाटकासाठी प्रयत्न सुरु असल्याने जगभरातील प्रेक्षकांना आता हे नाटक पाहता येईल. एप्रिल-मे पर्यंत हे नाटक रंगमंचावर येणार आहे. मराठी मध्ये या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हिंदीमधील नाटकाला नाट्य रसिक किती पसंती दर्शवितात हे तर आपल्याला नाटक रंगमंचावर आल्यावरच कळेल.