Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद पोंक्षे, लीना भागवत आणि मंगेश कदम म्हणतायेत 'चल तुझी सीट पक्की'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 12:55 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे नाटक रसिकांच्या भेटीला येत असून दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी नाट्य रसिकांना या नाटकातून अनुभवता येणार आहे.

मराठी रंगभूमीवर आता नवनवे विषय आणि नवनवीन प्रयोग केले जातायत असाच प्रयोग असलेलं नवं नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत अनेक कलाकृती रसिकांच्या भेटीला येत असतात. दिवाळीच्या सुट्या लक्षात घेऊन विविध सिनेमा आणि नाटकं रसिकांच्या भेटीला येतात. या सुट्टीच्या कालावधीत रसिकांना आकर्षित करण्याचा सिने-निर्माता आणि नाट्य-निर्मात्यांचा प्रयत्न असतो. यंदाची दिवाळीही अपवाद ठरली नसून विविध कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहेत. मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवं नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं नाव आहे 'चल तुझी सीट पक्की'. नाटक मंडळी प्रस्तुत या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन दीक्षित यांनी केलं आहे. या नाटकात अभिनेता शरद पोंक्षे, लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे नाटक रसिकांच्या भेटीला येत असून दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी नाट्य रसिकांना या नाटकातून अनुभवता येणार आहे. 

'चल तुझी सीट पक्की' हे नाटक जीवनाचे विविध पैलू आणि भावनांना हात घालणार आहे. या नाटकाला विजय गावंडे यांनी संगीत दिलं आहे. भूषण देसाई यांच्याकडे प्रकाशयोजना तर अमिता खोपकर यांच्याकडे वेशभूषेची जबाबदारी असणार आहे. प्रदीप मुळ्ये यांच्याकडे या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी असणार आहे. आता हे नाटक नाट्य रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का आणि दिवाळीत नाट्य रसिक नाट्यगृहांकडे आकर्षित होणार का याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्यात.