Join us

शांतेचं कार्ट चालू आहे!’ परत एकदा रंगभूमीवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 09:50 IST

‘शांतेचं कार्ट चालू आहे!’ या मराठी नाटकाला नाटकप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. अनेक कलाकारांनी या नाटकांचे यशस्वी प्रयोग केले.  ...

‘शांतेचं कार्ट चालू आहे!’ या मराठी नाटकाला नाटकप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. अनेक कलाकारांनी या नाटकांचे यशस्वी प्रयोग केले.  पण अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तर प्रेक्षकांचे ख-या अर्थाने मन जिंकले. आपल्या लाडक्या लक्ष्याच्या मनोरंजक अभिनयाने रंगभूमीवरील तो काळ गाजवला होता. 

आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे की, ‘शांतेचं कार्ट चालू आहे!’ हे नाटक परत एकदा रंगभूमीवर अवतरणार आहे.  ज्यांनी जुने नाटक पाहिलं आहे त्यांच्यासाठी हे नवं नाटक फार आकर्षक आणि उत्सुकता वाढवणारं असेल. पण ज्यांनी जुनं नाटक पाहिले नाही त्यांच्यासाठी हे नवं नाटक एक पूर्ण वेगळआ अनुभव ठरणार आहे. 

सिनेमंत्र निर्मित आणि विन्सन प्रॉडक्शन प्रकाशित ‘शांतेचं कार्ट चालू आहे!’ या नाटकाचे लेखक श्रीनिवास भणगे व दिग्दर्शक विजय केंकरे आहेत.  अमेय खोपकर, जितेंद्र ठाकरे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे तर संजय शेट्ये यांनी सहनिर्मिती केली आहे.  नेपथ्यची जबाबदारी प्रदीप मुळ्ये यांनी पेलली आहे. अजित परब यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे.