Join us

छाया घेतेय 'न्युड'साठी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:33 IST

                 सैराट, फॅन्ड्री, मी सिंधुताई सपकाळ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कसक ...

 
                सैराट, फॅन्ड्री, मी सिंधुताई सपकाळ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कसक दाखवून अभिनेत्री छाया कदमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सैराटमधील त्यांनी साकारलेल्या अक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता पुन्हा एकदा छाया नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रवी जाधवच्या आगामी 'न्युड' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आपल्याला छाया कदम आणि कल्याणी मुळे या दोन अभिनेत्री दिसणार आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपुर्वीच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये फक्त कल्याणी पाहायला मिळत होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये छाया कदम दिसते आहे.. यासंदर्भात सीएनएक्सशी बोलताना छाया  सांगते, मी जेव्हा या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिले होते तेव्हा मला वाटले, अरे आपल्याला अशा प्रकारच्या भूमिका साकारायला का मिळत नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी मला रवी जाधवने फोन केला आणि 'न्युड' चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. मला चित्रपटाची कथा आवडली मी लगेच होकार दिला. या भूमिकेसाठी मी विशेष तयारी करीत आहे. आणि बरीच मेहनत सुद्धा घेत आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.