सेक्सी उषा जाधवचा झाला बोल्ड मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:35 IST
मराठी अभिनेत्री उषा जाधव आता हिंदी सिनेसृष्टीत रूळलीय. 'भूतनाथ रिर्टन्स'नंतर आता ती राम गोपाल वर्माच्या 'वीरप्पन' सिनेमात विरप्पनच्या पत्नीच्या ...
सेक्सी उषा जाधवचा झाला बोल्ड मेकओव्हर
मराठी अभिनेत्री उषा जाधव आता हिंदी सिनेसृष्टीत रूळलीय. 'भूतनाथ रिर्टन्स'नंतर आता ती राम गोपाल वर्माच्या 'वीरप्पन' सिनेमात विरप्पनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एरवी सिनेमाच्या इव्हेंट्सना साडी नेसून येणारी उषा आपल्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वन पीसमध्ये दिसली. तिच्या हॉट मिनी वनपीसमधला हा तिचा बोल्ड लूक तिला सूट होत होता. आता हा तिचा Bold and Beautyfull मेकओव्हर म्हणायचा का?, असं विचारल्यावर उषा हसून म्हणाली, मेकओव्हर झाल्यासारखं नाही. पण ते ही माझंच रूप आणि हे ही माझंच रूप. मी अजूनही साडी नेसते. सिनेमातही मी साडीतच तुम्हांला दिसणार आहे. विरप्पनच्या पत्नीची मुथ्थुलक्ष्मीची मी भूमिका साकारलीय.विरप्पन सिनेमाविषयी ती सांगते, विरप्पनच्या पत्नीविषयी कोणालाच काही माहित नाही. विरप्पनच्या बायकोला आयुष्यात काय संघर्ष करावा लागला, हे सिनेमातून तुम्ही पाहाल. सध्या सिनेमाविषयी जास्त सांगू शकत नाही. पण एक साधी संसार करणारी ही बाई असल्याने मला विरप्पन सारख्या बंदूका चालवाव्या लागल्या नाहीत.बंदूका चालवल्या नसल्या तरीही सिनेमाच्या दरम्यान उषा बरीच धडपडलीय. ती सांगते, सिनेमाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही जंगलात शुटिंग करत होतो, तेव्हाच मला जबर लागलं होतं. मोठ्या मोठ्या दगडांवरून मी पळतेय असा सीन होता. आणि त्यावेळी बरंच खरचटलं. माज्या बोटांतून रक्त यायला लागलं होतं. त्यामूळे थोडक्यात सांगायचं तर सिनेमामूळे एक्शन सिक्वेन्सेसची रिहर्सल झालीय. त्यामूळे पूढची फिल्म एक्शन फिल्म करायला मला आवडेल.