Join us

थ्रिलर व सस्पेन्स असलेला निखिल महाजन दिग्दर्शित पुणे ५२ या चित्रपटाचा सिक्वेन्स येणार असल्याचे जाहीर झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:43 IST

मैत्री, लव्हस्टोरी, नातं,सासू-सून त्याचं प्रेम अशा काही चित्रपटांनी तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तसेच जर ...

मैत्री, लव्हस्टोरी, नातं,सासू-सून त्याचं प्रेम अशा काही चित्रपटांनी तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तसेच जर तुम्ही मराठी थ्रिलर व सस्पेन्स चित्रपटाची वाट पहात असाल तर आता,ती थांबविण्याची गरज आहे. कारण थ्रिलर व सस्पेन्स असलेला निखिल महाजन दिग्दर्शित  पुणे ५२ या चित्रपटाचा सिक्वेन्स येणार असल्याचे जाहीर झाले  आहे. अमर आपटे या १९९२ सालातील पुण्यामधील खाजगी गुप्तहेराची ही सत्यघटना या चित्रपटात दाखविण्यात आली होती. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी याने अमर आपटेची भूमिका साकारली होती. तसेच यामध्ये सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा देखील समावेश होता. आता याच चित्रपटाच्या सिक्वेन्सची तयारी सुरू आहे. सध्या या चित्रपटाच्या  स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या चित्रपटासाठी निखिल महाजन व गिरीश कुलकर्णी दोघे ही उत्सुक आहे.पण या चित्रपटात इतर कोण कलाकार असतील हे अजून ही गुलदस्त्यातच आहे.