Join us

‘सेल्फी’ ची अमेरिका भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:14 IST

‘सेल्फी’ हे ५ अभिनेत्रींचं नाटक महाराष्ट्रात तुफ्फान प्रतिसाद मिळवतंय. आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल तर झालेच ...

‘सेल्फी’ हे ५ अभिनेत्रींचं नाटक महाराष्ट्रात तुफ्फान प्रतिसाद मिळवतंय. आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल तर झालेच परंतु आता या नाटकाचे प्रयोग परदेशात पण होणार आहेत.

असीम एंटरटेनमेंट निर्मित ‘स्वत: कडे वळून बघताना... सेल्फी’ या नाटकाचे सादरकर्ते अजित भुरे आणि हेमंत टकले हे आहेत.  या नाटकाचे लिखाण शिल्पा नवलकर यांनी केले आहे तर दिग्दर्शन अजित भुरे यांनी केले आहे. या नाटकाचे ८ प्रयोग अमेरिकेमधील वेगवेगळ्या ठिकाणी ५ जून ते २६ जून दरम्यान होणार आहेत.

सुकन्या कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि सोनाली पंडीत या ५ अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असलेलं 'सेल्फी' हे नाटक अमेरिकेतील मराठी मंडळींना अनुभवयाला मिळणार आहेत. ही मंडळी सेल्फीच्या टीमसोबत सेल्फी काढण्यासाठी हमखास तयार असतील.