Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा: कोणत्या मराठी अभिनेत्रीने केला हा पोल डान्स,ज्यावर नेटीझन्स म्हणाले हा तर आहे 'मल्लखांब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 14:55 IST

मराठी सिनेमा, मालिका असो किंवा मग हिंदी मालिका या माध्यमातून नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सेक्सी आणि मादक अदांमुळे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' मालिकेत नेहा झळकली आणि नेहाचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री एक पोल डान्स व्हिडीओ केला आहे. खुद्द नेहानेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका गाण्यावर पोल डान्स करताना दिसतेय.हा पोल डान्स करताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत चर्चेचा विषय ठरतोय. कारण ज्या अंदाजात नेहा पेंडसे या व्हिडीओत पोल डान्स करताना दिसते त्या व्हिडीओला पाहून नेटीझन्स मात्र संभ्रमात असल्याचे पाहायला मिळतंय. कारण नेटीझन्स लाईक्स कॉमेटस देत म्हटल आहे की, हा पोल डान्स पेक्षा मल्लखांबच करत असल्याचे जास्त वाटतंय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसतातयेत.नेहाचा हा पोल डान्सचा प्रयत्न फसला असून तिने स्वतःच हसू सोशल मीडियावर करून घेतल्याची चर्चा मात्र रंगतेय. Also Read:नेहा पेंडसेला करायचे आहेत रिअॅलिटी शोजमराठी सिनेमा, मालिका असो किंवा मग हिंदी मालिका या माध्यमातून नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सेक्सी आणि मादक अदांमुळे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' मालिकेत नेहा झळकली आणि नेहाचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. या मालिकेत नेहाने एका बॉसची भूमिका साकारली होती.तिच्या याभूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.नेहान अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची भाग्यविधाता ही मराठी मालिका तर प्रचंड गाजली होती. तसेच ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील झळकली आहे. सनी देओल आणि महिमा चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्यार कोई खेल नही या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.नेहाने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट-मालिका, हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख मिळवल्यानंतर नेहाला काहीतरी वेगळे करायची इच्छा आहे. अनेक वर्षं मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता नेहाला रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा असल्याचे तिने दिलेल्या एका  मुलाखतीत म्हटले होते.