SEE PICS: असा आहे अजय-अतुलचा पुण्यामधील आलिशान आशियाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 15:31 IST
अजय अतुल या जोडीनं मराठीतल्या अनेकांना तोंडात बोटं घालायला लावतील असं संगीत बनवलं... त्याची भुरळ बॉलिवूडलाही पडली..यानिमित्ताने मराठी सिनेमांच्या ...
SEE PICS: असा आहे अजय-अतुलचा पुण्यामधील आलिशान आशियाना!
अजय अतुल या जोडीनं मराठीतल्या अनेकांना तोंडात बोटं घालायला लावतील असं संगीत बनवलं... त्याची भुरळ बॉलिवूडलाही पडली..यानिमित्ताने मराठी सिनेमांच्या गाण्यांना मिळालेली लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न बॉलिवूडकडून सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.अजय अतुलच्या संगीताची जादूच न्यारी... संगीतप्रेमींवर गारुड घालणा-या अजय अतुल या जोडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची रसिकांची उत्सुकता असते.खास अजय-अतुल फॅन्ससाठी त्यांची एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.आपलं स्वप्नातलं घरा खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकार असो किंवा मराठी कलाकर यांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. आता अजय-अतुल यांच्याही घराचे आतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय-अतुल यांनी सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अजय-अतुल या दोघा भावांनी आज पुण्यात एक मोठे आलिशान आशियाना उभारला आहे.पुण्यातील बाणेरमध्ये अजय-अतुल यांचे हे घर आहे. तीन बेडरूम, लिविंग एरिया,किचन तसेच एक साऊंड स्टुडिओही या घरात बनवून घेतला आहे.या घराचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.सचिन खाटपे यांनी अजय- अतुल यांच्या घराचे इंटेरियर केले आहे. अजय-अतुल यांच्या घराचे हे आतले खास फोटो फोटोग्राफर प्रशांत भट यांनी आपल्या कॅमे-यात टिपले आहेत.आता सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांप्रमाणे अजय-अतुल यांच्या घराचे फोटो व्हायरल होत आहे. अजय-अतुलच्या तालावर पुणेकर थिरकणारप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांच्या तालावर लंडन येथील प्रसिद्ध ग्रॅँड फिल हार्मोनिक आॅर्केस्ट्राचा साज अनुभवण्याची संधी संगीतरसिकांना मिळणार आहे.आज सायंकाळी ६़.३० वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे हा अविस्मरणीय फ्युजन सोहळा रंगणार आहे.तब्बल सहा वर्षांनी पुण्यात होत असलेल्या अजय-अतुल लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन गोल्डन पिरॅमिडने केले आहे. ‘लोकमत’च्या सहयोगाने या भव्य सोहळ्याचे आयोजन होणार आहे.तसेच मिर्ची लाइव्ह (रेडिओ मिर्ची) यांचा सहयोग आहे़ अजय-अतुल यांची तब्बल ३२ गाणी ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.तब्बल साडेतीन तासांचा हा सोहळा अजय- अतुल यांच्या लौकिकाला साजेसा भव्य होण्यासाठी तितकेच भव्य व्यासपीठ शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारले जात आहे. ४० ते ५० हजार प्रेक्षकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.