Join us

पाहा: जितेंद्र आणि रिंकू यांनी ताकी रे ताकी गाण्यावर असा धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 17:43 IST

रिंकू आणि जितेंद्र स्टेजवर असतानाच जितेंद्र यांनी एखादे नृत्य सादर करावे अशी विनंती प्रेक्षकांमधून करण्यात आली. त्यावर मी नृत्य करायचे असे तुम्हाला वाटत असल्यास मला श्रीदेवी, जयाप्रदासारखी अभिनेत्री नायिका म्हणून आणून द्या असे म्हणत जितेंद्र यांनी हशा पिकला.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते रिंकू राजगुरूला सिनेमा क्षेत्रातील महिला या विभागासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले. आपण ज्यांचे सिनेमे पाहून लहानाचे मोठे झालो. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रिंकू प्रचंड खूश झाली होती. हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर या सोहळ्-याचे सूत्रसंचालन करणाºया मृणाल कुलकर्णी यांनी तुम्ही सैराट हा चित्रपट पाहिला का असा प्रश्न जितेंद्र यांना विचारला. त्यावर मी चित्रपट पाहिला नसला तरी आता नक्कीच पाहिन असे उत्तर जितेंद्र यांनी दिले. रिंकू आणि जितेंद्र स्टेजवर असतानाच जितेंद्र यांनी एखादे नृत्य सादर करावे अशी विनंती प्रेक्षकांमधून करण्यात आली. त्यावर मी नृत्य करायचे असे तुम्हाला वाटत असल्यास मला श्रीदेवी, जयाप्रदासारखी अभिनेत्री नायिका म्हणून आणून द्या असे म्हणत जितेंद्र यांनी हशा पिकवली. श्रीदेवी, जयाप्रदा नसेल तर मला हेमामालिनी, रेखादेखील चालेल असेदेखील ते पुढे म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यावर प्रेक्षकांना हसू आवरत नव्हते. जितेंद्र यांनी नायिकेची मागणी केल्यानंतर तुम्ही रिंकूसोबत नृत्य करा अशी मागणी प्रेक्षकांनी केली. त्यावर नही ये तो बच्ची है असे म्हणत त्यांनी नकार दिला. पण त्यानंतर रिंकूला नृत्य करण्यासाठी प्रेक्षकांनी सांगितले. त्यावर लगेचच रिंकूने जितेंद्र सर नाचले तरच मी नाचेन असे सांगितले. त्यामुळे रिंकूच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी रिंकूसोबत ताकी... ताकी या गाण्यावर ताल धरला आणि जितेंद्र आणि रिंकूच्या नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली.