Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ पाहा आर्याला कसा मिळाला हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 12:45 IST

गायिका आर्या आंबेकर ती सध्या काय करते या चित्रपटातून  सिनेइंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत आहे. आर्याचा हा अभिनेत्रीचा प्रवास कसा झाला ...

गायिका आर्या आंबेकर ती सध्या काय करते या चित्रपटातून  सिनेइंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत आहे. आर्याचा हा अभिनेत्रीचा प्रवास कसा झाला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. आर्या सांगते, मी खूप जास्त उत्सुक आहे, पहिल्यांदाच सिनेमात काम करणं...बापरे कधी वाटलं नव्हतं. कारण अभिनय मी कधीच केला नव्हता, अगदी शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात देखील, अभिनय नक्की काय असतं हेदेखील मला माहीत नव्हतं. सहजच एकदा सतिश राजवाड्यांनी मला विचारलं माज्या सिनेमात काम करशील का ? माझं तर स्वप्न होतं सतिश सरांबरोबर काम करायचं. सारेगमप ज्यावेळी चालू होतं त्यावेळी सतिश राजवडे सर आम्हांला भेटायला आले होते, त्यावेळी असंभव ही मालिका चालू होती. त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई पुणे मुंबई यांसारख्या गोड लव्हस्टोरीची संकल्पना आणि त्यात आपल्याला काम करायला मिळालं तर असं नेहमी वाटायचं.मला काही अभिनय येत नसल्यामुळे मी घाबरले होते, थोडं टेन्शन आलं होतं तेव्हा सतिश सर म्हणाले तू काही टेन्शन घेऊ नको मी सगळं तुज्याकडून करून घेईन. मी जो काही या सिनेमातून अभिनय केला आहे, जी काही मेहनत घेऊन मी अभिनय केला आहे तो फक्त आणि फक्त सतिश सरांमुळे. लहानपणापासून आईकडून गाणं शिकत असल्यामुळे मी गाण्याचा रियाज करत आली, नियमित रियाज सुद्धा करते आणि मला आवड आहे त्यामुळे गाणं जमून गेलं. अभिनय आणि नृत्य विचाराल तर मी जशी आहे तशीच सेट वर गेली आणि जे काही केलं ते तर सतिश सरांनी करून घेतलं. राहिलं नृत्य तर मी एक कथ्थक आणि भरतनाट्यमची परिक्षा दिली आहे, त्यामुळे थोडं माहित होतं. तशी मी डान्स करायला घाबरते आणि अभिनय बेडेर्ने सुद्धा माज्याकडून चांगल्या पद्धतीने डान्स करून घेतला. आता आर्याने खरच कसा अभिनय या चित्रपटात केला आहे. हे तर आपल्याला नवीन वर्षातच समजेल.