संग्रामच्या फोटोसेशनचा राज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 12:28 IST
देवयानी या मालिकेतून संग्राम साळवी याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संग्रामचा तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग आज ...
संग्रामच्या फोटोसेशनचा राज
देवयानी या मालिकेतून संग्राम साळवी याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संग्रामचा तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग आज ही प्रेक्षकांच्या डोक्यात एकदमच फिट बसला आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराच्या हटके लूक असलेल्या फोटोसेशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. त्याच्या या हटके लूकविषयी संग्राम लोकमत सीएनएक्सला सांगतो, सध्या मालिकेमध्ये मी याच लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. तसे पाहता, लांब केस व मिशा असलेला हा लूक यापूर्वी मी कधी केला नव्हता. हा माझा हटके लूकच्या फोटोसेशन मागे एक राज आहे. तो राज म्हणजे काही दिवसातच ही लांब केस मी कट करणार आहे. त्यामुळे लांब केस व मिशा असलेला लूकची आठवण राहावी म्हणून हे सुंदर फोटोसेशन केले आहे. हे फोटोसेशन ठाणे येथे करण्यात आले आहे. माझी मैत्रिण स्वप्नाली पलांडे हिने हे सुंदर फोटो कॅ मेरामध्ये कैद केले आहे. असे हे ३० ते ३५ फोटो तासाभरात क्लिक करण्यात आले आहे. अशा या फोटोसेशनला खूप मजा व धमाल केली. संग्रामने त्याच्या या फोटोसेशनचे काही हटके अंदाज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्याच्या या लूकला सोशल मीडियावर भरभरून पसंती मिळताना दिसत आहे. तसेच काही गंमतीशीर कमेंन्टदेखील पाहायला मिळत आहेत. संग्रामने यापूर्वी मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ए चल - अस नसत रे, मितवा हे चित्रपट त्याचे प्रदर्शित झाले आहेत. तसेच काही चित्रपटाच्या आॅफरदेखील संग्रामजवळ असल्याचे समजत आहेत.