Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा सायली संजीव आणि ऋषी सक्सेना आले एकत्र, दिसणार रोमान्स करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 08:00 IST

शिव गौरी म्हणजेच ऋषी सक्सेना व सायली संजीव पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका काहे दिया परदेसमध्ये अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पहायला मिळाली होती. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात नाही तर एका म्युझिक अल्बममधून.या अल्बमचे नाव लाजीरा असे आहे. या अल्बमचे पोस्टरदेखील नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

अभिनेत्री सायली संजीवने लाजीराचे पोस्टर शेअर करून लिहिले की, "तिच्या मनानं त्याच्या दिलावर जणू इश्कच केलाय! त्यांच्या प्रेमाने त्यांचा जीव कसा बघ, लाजीरा झालाय" -अनुभव. एक कथा पुन्हा नाही घडू शकत पण जोडी? हां ती नक्कीच पुन्हा भेटू शकते...शिव गौरीची एक गोष्ट होती! आता एक गाणं चालेल? होऊ दे थोडा जीव लाजीरा??

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना लाजीरा या गाण्यामध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. हे गाणं गायलंय केवल वाळंज आणि स्नेहा महाडीकने तर संगीत केवल वाळंज व विकास विश्वकर्माने दिले आहे. तर या गाण्याचे विपुल घांगळे गीतकार आहेत. रेड बल्ब म्युझिक या गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. 

शिव गौरी म्हणजेच ऋषी व सायली संजीवच्या या गाण्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

 

 

टॅग्स :ऋषी सक्सेनासायली संजीव