Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायली संजवीने शेअर केलं ट्रे़डिशनल लूकमधले फोटो, तेजस्विनी पंडितच्या कमेंट्ने वेधलं साऱ्यांचं लक्षं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:00 IST

अनेक सेलिब्रेटींनी सायली फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.

सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. सायलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रेडिशनल लूकमधले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. तिच्या चाहत्यांना ही हे फोटोशूट आवडलं आहे त्यांनी लाईक्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे. ऐवढचं नाही तर सेलिब्रेटींनी ही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. तेजस्विनी पंडितने किती सुंदर अशी कमेंट् सायलीच्या फोटोवर केली आहे. सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सलील कुलकर्णी यांनी ही या फोटोवर कमेंट् केल्या आहेत. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर लवकरच सायलीच्या 'झिम्मा' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे.  सायलीच्या या हॉट अदा पाहून चाहत्यांनीही तिचे भरभरुन कौतुक केले आहे.

टॅग्स :सायली संजीव