Join us

साडीत खुललं सायली संजीवचे सौंदर्य, फोटो पाहून चाहते म्हणाले -'सुंदरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:00 IST

आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.

अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर सायली खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतला फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. तिच्या फॉलोवर्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

'काहे दिया परदेस' या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.

'काहे दिया परदेस' ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली.

सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता.

टॅग्स :सायली संजीव