Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठी अभिनेत्रीचे लग्नातील फोटो आले समोर, पती आहे तिचा संगीतकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 10:00 IST

'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सायली देवधर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. सायलीचा लग्नातील फोटो अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यानंतर सायलीने आता स्वत: लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

सायलीने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. एका फोटोत तिने सायलीने साऊथ इंडियन लूकमधील हेअर स्टाईल केली आहे. सायली आणि गौरवच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सायलीचा नवरा संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशी साखरपुडा केला होता. सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका ग्रुपसोबत नाटक केले आहे. सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :सायली देवधर