Join us

सौरभ गोखले आणि पुष्कराज चिरपुटकर एकत्रित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:07 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्ट्रीमध्ये प्रेक्षकांना सरप्राईज देण्याची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अनेक आगामी मराठी चित्रपट येऊ ...

सध्या मराठी चित्रपटसृष्ट्रीमध्ये प्रेक्षकांना सरप्राईज देण्याची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अनेक आगामी मराठी चित्रपट येऊ घालत आहेत. या नवीन चित्रपटांमध्ये हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना,प्रेक्षकांचे लाडके कलाकार सौरभ गोखले आणि पुष्कराज चिरपुटकर अशी अनोखी जोडी प्रेक्षकांना लवकरच  पाहायला  एक आगामी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. या दोन कलाकारांसोबत मराठीतील नामांकित अभिनेत्रीदेखील झळकणाकर असल्याचे कळत आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. तसेच या चित्रपटात या दोघांची काय भूमिका असणार हेदेखील कळाले नाही. मात्र प्रेक्षकांना आपल्या या दोन लाडक्या कलाकारांना एकाच चित्रपटात पाहण्याची संधी मिळणार आहे. अभिनेता सौरभ गोखले याने राधा ही बावरी या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तसेच त्याचा आगामी चित्रपट पेज फोर हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. सौरभ हा सध्या छडा नाटक करत आहे. सौरभ हा नेहमीच नाटक, मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असतात. तर पुष्कराज चिरपुटकरदेखील प्रेक्षकांना दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून पाहायला मिळाला होता. तसेच  तर पुष्कराजनेदेखील एक लघुपट दिग्दर्शित केले असल्याचे समजत आहे. मात्र अदयाप त्याच्या या लघुपटाचे नाव कळाले नाही. त्याचप्रमाणे पुष्कराजने नुकताच बॉलिवुडचित्रपटातदेखील पदापर्ण केले आहे. तो बुधियासिंग बॉर्न टू रन या हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मनोज बाजपेयी आणि श्रृती मराठेदेखील दिसली होती.