सतिश-अंकुशचा अॅटोग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 09:38 IST
अनेक दर्जेदार भुमिका साकारुन मराठीचित्रपटसृष्टीत स्वत:चे वलय निर्माण करणारा अभिनेता अंकुश चौधरी, आणि एक ...
सतिश-अंकुशचा अॅटोग्राफ
अनेक दर्जेदार भुमिका साकारुन मराठीचित्रपटसृष्टीत स्वत:चे वलय निर्माण करणारा अभिनेता अंकुश चौधरी, आणि एक से बढकेर एक असे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक सतिश राजवाडे या दोघांचाही अॅटोग्राफ आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे. अॅटोग्राफ पहायचा म्हणजे नक्की काय असे वाटत असेल तर या दोघांचाही अॅटोग्राफ नावाचा एक चित्रपट लवकरच त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अंकुश अन सतिशच्या जोडीने २००९ मध्ये गैर नावाचा थ्रिरल चित्रपट केला होता. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी झाल्यानंतर आता ही जोडी अॅटोग्राफसाठी सज्ज झाली आहे. अंकुशने नूकतेच बरेच हिट चित्रपट दिल्यानंतर आता अॅटोग्राफ मधुन तो नक्की कोणत्या भुमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. अॅक्टर-डिरेक्टरची ही हिट जोडी अॅटा२ग्राफ मधुन काय कमाल दाखवतीये हे आपल्याला लवकरच समजेल.