Join us

सैराटच झिंगाट सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:30 IST

सैराटच याड तर सगळ््यांनाच लागल्याच सध्या पहायला मिळतय. चित्रपट प्रदर्शित झाला अन लोकांनी तो अक्षरश: डोक्यावर घेतला. सैराटला मिळालेल्या ...

सैराटच याड तर सगळ््यांनाच लागल्याच सध्या पहायला मिळतय. चित्रपट प्रदर्शित झाला अन लोकांनी तो अक्षरश: डोक्यावर घेतला. सैराटला मिळालेल्या या उदंड प्रतिसादामुळे चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ११ दिवसांत ४१ कोटी बॉक्स ऑफिस कलेक्शन करणा-या ‘सैराट’ने आता ५५ कोटीचं कलेक्शन केलं आहे.  मराठी चित्रपटासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि हा आनंद सैराट टिमने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबत साजरा केला.  नुकताच जुहू येथील जे.डब्ल्यु. मॅरिएट हॉटेलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील  दिग्गज कलाकारांसोबत सैराटच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी सैराटच्या संपूर्ण टीमसोबत संजय जाधव, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, महेश मांजरेकर, रवि जाधव, प्रिया बापट, सचिन कुंडलकर, अमृता खानविलकर, इशा कोपीकर, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे आदी कलाकार उपस्थित होते.  या कलाकारांनी सैराट टीमसोबत झिंगाट होऊन झिंगाट डान्स केला.