नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने त्यांच्या यशामुळे बॉलिवूड आणि इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीला आकर्षित केलं.
नुकतीच 'झी स्टुडियोझ'ने 'सैराट' च्या ८५ करोड बॉक्स ऑफिस कलेक्शनचे यश बीकेसी येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये यश साजरे केले.
'सैराट' च्या सक्सेस पार्टी दरम्यान एक महत्त्वाची सूचना करण्यात आली. ती महत्त्वाची सूचना प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची असणार. 'सैराट' चा ३ भाषेत रिमेक होणार आहे. तामिळ, मल्याळम आणि तेलगु भाषेत 'सैराट' चा रिमेक बनणार आहे.
'सैराट' चे यश आणि त्याच्या रिमेकच्या बातमीचा आनंद सर्वांनी घेतला. यावेळी 'सैराट' च्या टीम सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि मिडीया पण उपस्थित होती.