Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सैराटचा झिंगाट आता दक्षिणेतही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 19:27 IST

महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील सिनेमागृहात सुसाट धावून धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील सिनेमागृहात झिंगाट करायला सज्ज ...

महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील सिनेमागृहात सुसाट धावून धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील सिनेमागृहात झिंगाट करायला सज्ज झाला आहे. चेन्नई आणि केरळमध्ये आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेथील बॉक्स आॅफिसवर सैराट काय याड लावतो, याची उत्सुकता आहे. २९ एप्रिलला हा सिनेमा रिलीज झालाय. आतापर्यंत या सिनेमाने ८० कोटीहून अधिक कमाई केलीये. लवकरच हा सिनेमा १००कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल यात शंकाच नाही.